'निपाह' व्हायरसने केरळमध्ये घातलं थैमान, 10 जणांनी गमवला जीव

'निपाह' विषाणू म्हणजे काय?

Renuka Dhaybar
केरळ, 22 मे : केरळमध्ये नुकताच निपाह नावाच्या विषाणूची बाधा झाल्याने मागच्या काही तासांत 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. केरळ आरोग्य विभागाने राज्यभर हाय अलर्ट घोषित केला आहे. सध्या या विषाणूची केरळमध्ये लागण झाली असली तरीही संपूर्ण भारतात त्याचा धोका उद्भवू शकतो.केरळच्या आरोग्य विभागाने जिल्हास्तरावर या विषाणूची माहिती देणारी सर्व माहिती पोहोचवली आहे. हा विषाणू आणखी पसरु नये यासाठी सर्व ती खबरदारी सध्या घेण्यात येत आहे. ज्यांना या विषाणूची बाधा झाली असण्याचा संशय आहे अशा रुग्णांचा शोध सुरु आहे.'निपाह' विषाणू म्हणजे काय?

१. जनावरं आणि मानवावर वेगाने हल्ला- गंभीर आजार निर्माण करण्याची क्षमता२. पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटने केलेल्या संशोधनानुसार, 1998 मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगईमधील निपाह नावाच्या गावात विषाणू सापडला३. सुरुवातीला लागण डुकरांना लागण- नंतर स्थानिक शेतकऱ्यांमध्ये पसरला4. बांग्लादेश आणि मलेशियात प्रमाण जास्त'निपाह'ची लक्षणं कोणती ?- थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्क आल्यामुळे- थेट मेंदूवर हल्ला, मेंदुत ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण- सुरूवातीला 7-10 दिवस ताप, थकवा, शुद्ध हरपणं, चक्कर येणं, उलट्या होणं, मळमळणं, अस्वस्थ वाटणं- तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यताकेरळ मध्ये आलेल्या निपाह व्हायरच्या पार्श्वभूमीवर राज्यातही दक्षता घेण्यात येतेय. या व्हायरसचा अटकाव कसा करावा, त्यासंदर्भात राज्यात अलर्ट देण्यासाठी आज आरोग्य मंत्री सावंत यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी महापालिका, राज्य सरकारचे आरोग्य अधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत. 

Trending Now