मोदी सरकारच्या या सुपरवुमन लढवतायेत भारताची खिंड

जगभरात देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तेवढ्याच मजबूत खांद्यांची गरज असते. मोदी सरकारने त्यांच्या मंडळातील महत्त्वपूर्ण मंत्रालयांची जबाबदारी तेवढ्याच सक्षम हातात दिली आहे.

सध्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो आणि संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस मंत्रीस्तरीय चर्चेसाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांचे स्वागत भारताच्या परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी केले. या दौऱ्यात संरक्षण, तेल आयात, दहशतवाद यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा केली गेली.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळ्यासाठी सहकार्य करण्याची तयारी अमेरिकेने दाखवली आहे. या चर्चेत अमेरिका आणि भारताच्या परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांसाठी हॉलटाइन सेवा सुरू करण्याबाबद निर्णय घेण्यात आला. कोणत्याही देशात परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री ही दोन खाती फार महत्त्वाची असतात. जगभरात देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तेवढ्याच मजबूत खांद्यांची गरज असते. मोदी सरकारने त्यांच्या मंडळातील महत्त्वपूर्ण मंत्रालयांची जबाबदारी तेवढ्याच सक्षम हातात दिली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे देशातील महत्त्वपूर्ण खाती मोदी सरकारने दिली.

Trending Now