VIDEO: अटल बिहारी वाजपेयी दौऱ्यांमध्ये असे भेटायचे नरेंद्र मोदींना

राजकारणातून संन्यास घेण्यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देशभरात अनेक ठिकाणी प्रवास करावा लागायचा. या प्रवासात त्यांना शेकडो कार्यकर्ते भेटायचे. सगळ्यांशीच त्यांचं भेटणं आपुलकीचं असायचं. मात्र तेव्हाच्या राजकारणात अशी एक व्यक्ती होती ज्यांना ते इतर कार्यकर्त्यांप्रमाणे भेटायचे नाही. ते कार्यकर्ते दुसरे तिसरे कोमी नसून सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. मोदींना वाजपेयी कधीच इतरांसारखे भेटले नाही. मोदी कुठेही दिसले तरी वाजपेयींच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हसू यायचं आणि ते दोन्ही हात पसरवून मोदींना आलिंगन द्यायचे. आलिंगन देताना मोदी त्यांच्या छातीपाशी डोकं टेकवायचे तेव्हा वाजपेयी मोदींच्या पाठीवर मोठ्या भावासारखी थाप मारायचे.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now