मल्ल्या-नीरव मोदीची संपत्ती होणार जप्त,अध्यादेशाच्या प्रस्तावाला मंजुरी

Sachin Salve
नवी दिल्ली, 21 एप्रिल : विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारख्या पळकुट्या आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्यासाठी सरकारने कडक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने  फ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिल 2018 ला कॅबिनेटनं मंजुरी दिली आहेय.100 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या प्रकरणात निर्णयाआधीच संपत्ती जप्त करता येवू शकते अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. जुन्या प्रकरणांमध्येही या विधेयका अंतर्गत कारवाई होऊ शकते.या विधेयकानुसार आर्थिक गुन्हे केलेल्यांची संपत्ती जप्त होवू शकेल .यामुळे नीरव मोदी, विजय मल्ल्या सारख्या गुन्हेगारांची संपत्ती जप्त करणं सोप होईल. हे विधेयक सरकार बजेट सत्रामध्ये पास करू इच्छित होती पण अपयशी ठरली.

Trending Now