#News18RisingIndia : संस्कार शब्द डाग असल्यासारखा वाटतो -स्मृती इराणी

न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया समिटमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि सेंन्सार अध्यक्ष प्रसून जोशी यांनी उपस्थिती लावली होती

Sachin Salve
19 मार्च : न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया समिटमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि सेंन्सार अध्यक्ष प्रसून जोशी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी स्मृती इराणी यांनी, "संस्कार शब्द हा इतका वापरला जातोय की आता डाग लागल्यासारखा वाटतोय."संस्कार आणि नैतिकतेवर प्रसून जोशी म्हणाले की," आपण आपल्या नफ्या-तोट्यासाठी संस्कार शब्दाचा वापर करतो","ज्या संस्कृतीमध्ये नैतिकता नसते ती लोकं स्वत:वर अभिमान बाळगू शकत नाही" असंही जोशी म्हणाले.प्रसून जोशी हे आपल्या कामासह सामाजिक जबाबदारी सुद्धा चांगल्या प्रकारे पार पाडतात. या दोन्ही गोष्टी सांभाळण्यात त्यांचा चांगला हातखंडा आहे असं म्हणत स्मृती इराणी यांनी प्रसुन जोशी यांचं कौतुक केलं. हल्ली कलात्मक गोष्टींना तांत्रिक बाबींचा हातभार लाभतोय आणि तांत्रिक बाबींना कलात्मक गोष्टी आवाहन देत आहे असंही इराणी म्हणाल्यात.

Trending Now