औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नोकरी सोडून सैन्यात भर्ती होणार त्याचे ५० मित्र

शहीद औरंगजेब चे 50 मित्र सऊदी अरबमधील त्यांच्या भक्कम पगार असलेल्या नोकऱ्या सोडून भारतात परतले आहेत.

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट :  जम्मू कश्मीरात शहीद झालेला जवान औरंगजेब च्या मित्रांनी त्याचा बदला घेणार असल्याची शपथ घेतली आहे. शहीद औरंगजेब चे 50 मित्र सऊदी अरबमधील त्यांच्या भक्कम पगार असलेल्या नोकऱ्या सोडून भारतात परतले आहेत. सैन्यात किंवा पोलीस मध्ये भर्ती होऊन शहीद झालेल्या त्यांच्या मित्राचा बदला घ्यायचा हा एकच त्यांचा उद्देश आहे. सऊदी अरबमधील नौकऱ्या सोडणं हे त्यांच्यासाठी वाटतं तितकं सोपं नव्हतं. नौकऱ्या सोडतांना त्याना अनेक अडचणी आल्यात. पण, औरंगजेबच्या मृत्यूबाबत माहिती मिळताच त्यांनी नौकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला. आणि आता तो उद्देश साध्य करण्यासाठी ते परतले आहेत.14 जून रोजी आतंकवाद्यांनी कश्मीरच्या पुलवामा मध्ये औरंगजेब ची हत्या केली होती. तेव्हा शोकमग्न औरंगजेबचे वडील मोहम्मद हनीफ यांनी स्वतः आपल्या मुलाचा बदला घेणार असल्याचे म्हटले होते. दो महीन्यानंतर शहीद औरंगजेबचे गाव सलानी येथे त्याचे 50 मित्र जमले आहेत. जे आखाती देशोंमध्ये भक्कम पगारच्या नौकऱ्या करीत होते. त्या सर्वांचा एकच उद्देश आहे शहीद औरंगजेबचा बदला घेणे.मोहम्मद किरामत आणि मोहम्मद ताज यांनी सांगितले की, त्यांनी औरंगजेबच्या मृत्यूची वार्ता कळताच नौकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. किरामत म्हणाला की, सऊदीमध्ये अचानक नौकरी सोडता येत नाही. पण आम्ही ऐनकेन प्रकारे आम्ही ती सोडली. आता आमचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे शहीद औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेणे.

हेही वाचा..लाट कायम!, सांगलीत 'कमळ' उमललं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं स्वप्न भंगलंप्लास्टिक बंदीमुळे दिवाळखोर झालेल्या व्यापाऱ्याची आत्महत्याVIDEO : मुंबईमध्ये विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी, मोठा अपघात टळलाmartyr, For a friend, 50, leave jobs,

Trending Now