मालदीव- भारताचे संबंध बिघडले, हेलिकॉप्टर आणि सैनिक मागे घेण्याची भारताला सूचना

यमीन यांना लवकरात लवकर मालदीवमधून भारताची पायमूळ उखडून काढायची आहेत.

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट- भारताचा शेजारील देश मालदीवमध्ये चीनचं वर्चस्व वाढत चाललं आहे. यामुळेच मालदीव सरकारने भारताने तैनात केलेले दोन हेलिकॉप्टर आणि ५० सैनिक मागे घेण्याची सूचना केली आहे. इमरजन्सीमध्ये रुग्णांना उपचारांसाठी वाहून नेण्याच्या कामासाठी या दोन हेलिकॉप्टरचा वापर केला जाई. मात्र आता मालदीवने त्यांची स्वतःची सेवा सुरू केल्यामुळे भारताला त्यांचे सैनिक आणि हेलिकॉप्टर परत नेण्याची विनंती मालदीव सरकारने केली आहे. मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यांनी याबद्दल सविस्तर माहिती भारत सरकारला दिली.आजवर भारताने मालदीवला सातत्याने लष्करी आणि नागरी मदत केली. मात्र आता मालदीवमध्ये चीन आपले वर्चस्व प्रस्थापित करु पाहत आहे. म्हणूनच भारताच्या प्रभावाला चीनने अनेक मार्गांनी आव्हान देण्यास सुरूवात केली आहे. मालदीवचे अध्यक्ष चीनच्या बाजूने झुकले असल्यामुळे चीनला त्यांचे बस्तान मालदिवमध्ये बसवणं शक्य होत आहे. यमीन यांना लवकरात लवकर मालदीवमधून भारताची पायमूळ उखडून काढायची आहेत. याचसाठी यमीन यांनी भारतीय कर्मचाऱ्यांच्या व्हिसाच्या मुदत संपल्या असून त्यांनी भारतात परत जावे असे सांगितले.हेही वाचा-

काळ आला होता, वेळ नाही : भुस्खलनातून असा वाचला स्कुटरस्वारब्रिटिश एअरवेज वर्णव्देषी,त्यांच्यावर बहिष्कार टाका : ऋषी कपूरचा संताप खळबळजनक खुलासा : 'मुंबई, पुणे, सातारा हिंदु्त्ववाद्यांच्या रडावर', 20 बॉम्ब जप्तInd vs End- खेळण्याची संधी देऊन विराटनेच दिला दगा

Trending Now