VIDEO: भरसभेत राज्यमंत्रीने महिलेचा पदर डोक्यावरून सरकवला

या सम्मेलनात प्रदेश सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल माहिती देण्यात येत होती

भिंड, ०५ ऑगस्ट- मध्यप्रदेशचे राज्यमंत्री लालसिंह आर्य यांनी भर सभेत एका महिलेचा पदर डोक्यावरून वर सारल्यामुळे गदारोळ माजला आहे. फोटो काढण्याच्या उत्साहात आर्य यांच्याकडून ही चूक झाली. मंत्र्यांच्या या कृतीमुळे क्षणभर ती महिलाही भांबावून गेली. मात्र लगेच त्यांनी सर्व गोष्टी सांभाळून घेत वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेतली. पण आर्य यांच्या या कृतीची काँग्रेसकडून निंदा केली जात आहे. भिंडमध्ये जिल्हा मुख्यालयासमोर सोमवारी एका सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या सम्मेलनात प्रदेश सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल माहिती देण्यात येत होती. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक तिथे उपस्थित होते. याच कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून राज्यमंत्री लालसिंहही पोहोचले. त्यांच्यासोबत नरेंद्र सिंह कुशवाह, जिल्हा कलेक्टर आशिष गुप्ता आणि अन्य जिल्हा अधिकारीही उपस्थित होते.

Trending Now