अटल- आडवाणी ६५ वर्षांची मैत्री आणि बरंच काही

‘मी आरएसएससाठी प्रचार करायचो. तेव्हापासून ते भारतीय जनसंघाची सुरूवात, आणीबाणीचा विरोध आणि १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या बांधणीपर्यंत आम्ही प्रत्येकक्षणी एकत्र होतो.’

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान (एम्स) येथे अखेरचा श्वास घेतला. ते ९३ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात होते. आज संध्याकाळी ४ वाजता दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळ (विजय घाट, राज घाट) येथे अंतिम संस्कार केले जातील. वाजपेयींच्या निधनाने माझं वैयक्तिक नुकसान झाल्याचं लालकृष्ण आडवाणी यांनी सांगितले. ‘मी आणि अटल गेल्या ६५ वर्षांपासून एकत्र आहोत. यापुढे त्यांची फार आठवण येईल,’ असे आडवाणी यांनी जड अंतःकरणाने सांगितले.‘माझं दुःख व्यक्त करायला आज माझ्याकडे शब्द नाहीत. आम्ही सारेच भारतातील सर्वात मोठ्या नेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. अटलजी माझ्यासाठी एका वरिष्ठ नेत्याहून अधिक होते. गेल्या ६५ वर्षांमध्ये ते माझे सर्वात जवळचे मित्र होत.’ आरएसएस प्रचारक म्हणून आडवाणी आणि वाजपेयी यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरूवात केली. या दिवसांपासूनच हे दोघं घनिष्ठ मित्र झाले. त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना आडवाणी म्हणाले की, ‘मी आरएसएससाठी प्रचार करायचो. तेव्हापासून ते भारतीय जनसंघाची सुरूवात, आणीबाणीचा विरोध आणि १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या बांधणीपर्यंत आम्ही प्रत्येकक्षणी एकत्र होतो.’

वाजपेयींच्या भाचीचा हा VIDEO पाहून तुम्हालाही होतील अश्रू अनावर

‘भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयींनी तीन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते बिगर काँग्रेस पक्षाचे पहिलेच नेते होते. त्यांच्या हाताखाली काम करण्याची मला संधी मिळाली. एक वरिष्ठ नेता म्हणून त्यांनी नेहमीच मला पाठिंबा दिला आणि मार्गदर्शन केले.’ आडवाणी पुढे म्हणाले की, ‘वाजपेयींकडे असणारी नेतृत्व क्षमता, मंत्रमुग्ध करणारे वकृत्व, देशभक्ती आणि या सर्वांहून अधिक त्यांच्यात मुलतः असणारी दया, नम्रता यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांसोबतही त्यांचे चांगले संबंध होते. राजकारणात त्यांचा विरोध झाला तर विरोधकांचे मन कसे जिंकायचे हे त्यांना पुरेपूर माहित होते.’ पुढे आडवाणी म्हणाले की, ‘मला अटल बिहारी वाजपेयींची फार आठवण येईल.’

Trending Now