#AtalBihariVajpayee : उद्या होणार अटल बिहारी वाजपेयींवर अंत्यसंस्कार

२००९ पासून अंथरुणाला खिळून असलेले अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त आहेत

18:43 (IST)

... अन् रक्षाबंधनला अटलजींना राखी बांधायचीच राहिली

18:42 (IST)

अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी नवी दिल्लीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. एम्स मधून त्यांच पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येत आहे. उद्या सकाळी भाजपच्या मुख्यालयात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंतयात्रा निघणार असून विजय घाटाजवळ अंत्यसंस्कार होणार आहेत. तिथे दिड एकर जागा राखीव ठेवण्यात आली असून त्याच ठिकाणी अटलजींचं स्मारक होणार आहे.

18:23 (IST)

18:22 (IST)

अटलजी : भारतीय राजकारणातला दिलदार नेता

18:14 (IST)

गेल्या 9 आठवड्यांपासून त्यांच्यावर 'एम्स'मध्ये उपचार सुरू होते. चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वाढतं वय आणि दिर्घ आजारामुळे उपचारांनाही प्रतिसाद देणं त्यांनी बंद केलं होतं. शेवटपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र अटलजींची आजाराशी असलेली झुंज अखेर संपली.

18:14 (IST)

ते 94 वर्षांचे होते.

18:13 (IST)

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दिल्लीतल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये निधन झालं.

18:13 (IST)

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन

17:04 (IST)

17:03 (IST)

16:25 (IST)

एम्समध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक
 
16:24 (IST)

राहुल गांधी एम्स मध्ये वाजपेया यांच्या भेटीसाठी पोहोचले

15:31 (IST)

भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते रुग्णालयातच

15:30 (IST)

भाजप अध्यक्ष अमित शहा अजूनही एम्स रुग्णालयात

14:59 (IST)

Aims चा सुरक्षा व्यवस्था वाढवली-  केंद्रीय गृहमराज्य मंत्री हंसराज अहिर

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दिल्लीतल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. गेल्या 9 आठवड्यांपासून त्यांच्यावर 'एम्स'मध्ये उपचार सुरू होते. चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वाढतं वय आणि दिर्घ आजारामुळे उपचारांनाही प्रतिसाद देणं त्यांनी बंद केलं होतं. शेवटपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र अटलजींची आजाराशी असलेली झुंज अखेर संपली.

Trending Now