कर्नाटकातलं मतदान संपताच जेडीएस नेते कुमारस्वामी गेले सिंगापूरला!

कर्नाटकची रणधुमाळी यंदा चांगलीच गाजली. या राज्याच्या निवडणुकांच्या प्रचारात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींनीही जोरदार प्रचार केला. पण सगळ्यात महत्त्वाचा ठरला तो म्हणजे जेडीएस फॅक्टर. देवेगौडा आणि कुमारस्वामी या नेत्यांच्या प्रचंड गर्दी जमा झाली.

Chittatosh Khandekar
13 मे  :   कर्नाटकातील  विधानसभेसाठी मतदान काल संपलं. 70 टक्क्यांहून अधिक लोकांनी  मतदान केलंं .पण मतदान संपताच यावर्षी किंगमेकर ठरू शकणाऱ्या जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी मात्र लगेच सिंगापूरला गेले आहेत.कर्नाटकची रणधुमाळी यंदा चांगलीच गाजली.  या राज्याच्या  निवडणुकांच्या  प्रचारात   राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींनीही जोरदार प्रचार केला. पण सगळ्यात महत्त्वाचा ठरला तो म्हणजे जेडीएस फॅक्टर. देवेगौडा  आणि कुमारस्वामी या नेत्यांच्या प्रचंड गर्दी जमा झाली.  काँग्रेसच्या भाजपच्या  तुलनेत प्रतिसाद ही भरपूर मिळाला.  त्यामुळेच जेडीएस यावर्षी किंगमेकर ठरू शकतं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कालच्या एक्झिट  पोल्समधून ही हे चित्रच स्पष्ट झालं.  आता काँग्रस आपली सत्ता टिकवतं की भाजपचा विजयाचा वारू असाच धावत राहतो हे 15 मे ला कळेलच.पण  अशाचतच राज्यभर प्रचार करून कुमारस्वामी मात्र तीन दिवसााची सुट्टी घेऊन सिंगापूरला गेले आहेत.याआधी राहुल गांधी निवडुकांनंतर फॉरेन ट्रीपला जायचे. पण कुमार स्वामी फक्त फॉरेन ट्रीपला  गेले की यातून काही वेगळा संदेश त्यांना द्यायचा आहे हे येणारा काळच ठरवेल.

Trending Now