अटलजींना मुखाग्नी देणाऱ्या कोण आहेत नमिता भट्टाचार्य?

अटलजी नेहमी म्हणतात की, माझ्या लग्नाची वरात निघाली नाही तर याचा अर्थ असा नाही की मी माझं संपूर्ण आयुष्य अविवाहित राहिलो.

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा विवाह झाला नाही. पण ते स्वत:बद्दल नेहमी म्हणतात की, माझ्या लग्नाची वरात निघाली नाही तर याचा अर्थ असा नाही की मी माझं संपूर्ण आयुष्य अविवाहित राहिलो. 70च्या दशकात अटलजींनी नमिता कौलला आपली दत्तक मुलगी म्हणून स्वीकारलं. जेव्हा अटलजींचा मृत्यू झाला, तेव्हा सर्व लोक नमिताचं सांत्वन करण्यासाठी येत होते.नमिता वयाच्या पाचव्या दशकात आहे. वाजपेयींच्या संमतीनेच 1983ला नमिताचा विवाह झाला होता. वास्तविक, नमिताची आई आणि वडील राजकुमारी कौल आणि ब्रिज नारायण कौल आहेत. पण जेव्हा 70च्या दशकात नमिता तरुण होती, तेव्हा अटलजींनी तिला आधिकारिकरित्या दत्तक मुलगी म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कौल कुटुंब अटलजींचे एक प्रकारे कुटुंबियचं बनले होते.ग्वाल्हेरमध्ये त्या काळी वाजपेयी आणि राजकुमारी कौल हे एकाच वर्गात शिकत होते. त्या काळात स्पष्टपणे बोलण्याचं अटलजींना धाडस कधी झालं नाही, शेवटी धाडस करून त्यांनी प्रेमपत्र लिहिलं. पण त्याचं उत्तर कधी त्यांना मिळालं नाही.

नंतर दिल्लीत पुन्हा अटलजी आणि राजकुमारी कौल यांच्यात मैत्री झाली आणि नंतर ती घट्ट होत गेली. राजकुमारी कौल आणि त्यांचे पती हे वाजपेयींच्या कुटूंबाचाच एक भाग झाले. वाजपेयी खासदार झाल्यानंतर राजकुमारी कौलही दिल्लीत आल्या होत्या.त्यांचे पती दिल्लीतल्या राजमस कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. नंतर अटलजी त्यांच्या कुटूंबातच रहायला गेले. राजकुमारी यांच्या कन्या नम्रता आणि नमिता यांना वाजपेयींनी दत्तक घेतलं होतं. नमिताने रंजन भट्टाचार्यशी लग्न केलं. नंतर रंजनही वाजपेयींसोबतच राहायला लागले. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर रंजन हे त्यांचे ओएसडी होते.मे 1994 मध्ये जेव्हा राजकुमारी कौल यांचं निधन झालं तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांच्या निधनाचं वृत्त आलं. तेव्हा पहिल्यांदाच लोकांना कळलं की त्या वाजपेयींच्या कुटूंबियांच्या घनिष्ठ सदस्य होत्या. VIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले

Trending Now