काश्मीरमधील जनतेला मोदींमध्ये वाजपेयींना पाहायचंय- मेहबूबा मुफ्ती

काश्मीरमध्ये एका वर्षात जवळपास १४२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला

काश्मीर, २५ ऑगस्ट- जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये एका वर्षात जवळपास १४२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक आर.आर. भटनागर यांनी दिली आहे. काश्मीर खोऱ्यात अजूनही २०० ते २५० दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. २०१६-१७ शी तुलना करता जवान जखमी होण्याची आकडेवारी कमी झाली आहे, असंही भटनागर म्हणाले. तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भर्ती होण्यापासून रोखण्यासाठी 'मददगार' हेल्पलाइन सुरु करण्यात आली होती. यावर गेल्या एका वर्षात तब्बल अडीच लाख फोन आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा काश्मीरमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'काश्मिरीयत, जम्हूरीयत आणि इन्सानियत' धोरणाची अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी वाजपेयींनी २००३ मध्ये 'काश्मिरीयत, जम्हूरीयत आणि इन्सानियत' ही त्रिसूत्री निर्धारित केली होती. कारगिल युद्ध आणि संसदेवरील हल्ल्यानंतरही वाजपेयी यांनी चर्चेची दारं बंद केली नव्हती. सोबतच मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमधील जनतेला नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पाहायचं आहे असंही म्हटलं आहे.यावळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दाखवलेल्या चर्चेच्या तयारीवरुन त्यांची बाजू घेतली. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमधील रक्तपात थांबवायचा असेल तर वाजपेयींनी दाखवलेला मार्ग अवलंबला पाहिजे असं म्हटलं आहे.

VIDEO : आय लव्ह इंडिया,पण माझा संघ इराण

Trending Now