VIDEO : 'जय श्रीराम'च्या घोषणा देत स्वामी अग्निवेश यांना बेदम मारहाण

पाकुंडमधील स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला करण्यात आला. जमावाने स्वामी अग्निवेश यांना बेदम मारहाण केलीये. मारहाण करणारे हे भाजपचे कार्यकर्ते होते असा आरोप स्वामी अग्निवेश यांनी केलाय. स्वामी अग्निवेश हे पाकुड दौऱ्यावर आले होते. सकाळपासून त्यांच्या या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनाकडून विरोध होत होतो. भाजपचे कार्यकर्तेही काळे झेंडे घेऊन विरोध करत होते. स्वामी अग्निवेश हे हाॅटेलमधून बाहेर आले त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.काही दिवसांपूर्वी स्वामी अग्निवेश यांनी सनातन धर्म आणि गोमांस बंदीवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून त्यांच्याविरोधात टीकेचा धुराळ उडाला होता. भाजपसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सारख्या संघटनांनी स्वामी अग्निवेश यांचा निषेध करण्यासाठी हॉटेलबाहेर एकत्र जमले होते. स्वामी अग्निवेश बाहेर येताच त्यांवार हल्ला करण्यात आला.

News18 Lokmat

Your browser doesn't support HTML5 video.

झारखंड, 17 जुलै : पाकुंडमधील स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला करण्यात आला. जमावाने स्वामी अग्निवेश यांना बेदम मारहाण केलीये. मारहाण करणारे हे भाजपचे कार्यकर्ते होते असा आरोप स्वामी अग्निवेश यांनी केलाय. स्वामी अग्निवेश हे पाकुड दौऱ्यावर आले होते. सकाळपासून त्यांच्या या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनाकडून विरोध होत होतो. भाजपचे कार्यकर्तेही काळे झेंडे घेऊन विरोध करत होते. स्वामी अग्निवेश हे हाॅटेलमधून बाहेर आले त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.काही दिवसांपूर्वी स्वामी अग्निवेश यांनी सनातन धर्म आणि गोमांस बंदीवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून त्यांच्याविरोधात टीकेचा धुराळ उडाला होता. भाजपसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सारख्या संघटनांनी स्वामी अग्निवेश यांचा निषेध करण्यासाठी हॉटेलबाहेर एकत्र जमले होते. स्वामी अग्निवेश बाहेर येताच त्यांवार हल्ला करण्यात आला. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

Trending Now