काश्मीरमध्ये चकमकीत मेजरसह 4 जवान शहीद, 4 दहशतवादी ठार

उत्तर काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये लष्कराचे एक मेजर आणि 3 जवान शहीद झाले आहेत.

जम्मू काश्मीर, 07 ऑगस्ट : उत्तर काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये लष्कराचे एक मेजर आणि 3 जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत या 4 जणांना वीरमरण आलं आहे. या चकमकीत एकूण 8 दहशतवादी होते. त्यातल्या 4 दहशतवाद्यांना आपल्या जवानांनी कंठस्नान घातलं आहे. या परिसरात चकमक अजूनही सुरू आहे. गुरेज हे एलओसीजवळ आहे. श्रीनगरपासून 123 किलोमीटरवर गुरेज सेक्टर आहे. काल रात्री लष्कराचा एलओसीवर संशयित हालचाली दिसल्या. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. लौसर, सरदारी, नुशेरानर आणि दुरमत या पाकव्याप्त काश्मीरमधल्या गावांमधून दहशतवादी आपल्या हद्दीत घुसले.मेजर केपी राणे, हवलदार जामी सिंग, हवलदार विक्रमजीत, रायफल मॅन मनदिप अशी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत. काश्मीरच्या या चकमकीत या 4 जवाणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. ही चकमक अजूनही सुरू आहे. त्यामुळे आता भारतील सैन्य याचा बदला घेण्याच्या पवित्र्यात कारवाई करत आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरून रावते आणि तावडेंमध्ये खडाजंगी

सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारपासून पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर वारंवार गोळीबार सुरू होता. यावेळी, सीमावर्ती भागात भारतातील 8 दहशतवादी घुसखोरी करताना आढळले आहे. जेव्हा भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, तेव्हा त्यांनीही गोळीबार करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत. गोळीबारामध्ये एक मेजर असत शहीद माहिती आहे.या ऑपरेशनमध्ये लष्कराच्या 36 राष्ट्रीय रायफल्स आणि  9 ग्रेनेडियर्स यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. लष्करी माहिती नुसार, अजूनही अनेक दहशतवादी या क्षेत्रात लपलेले आहेत. असे म्हटले जाते की 2003च्या कराराच्या पहिल्यांदाच या क्षेत्रात पाकिस्तानसाठी मोर्टर्स वापरले जात आहेत. पाकिस्तानाच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी  भारतीय सैनिक देखील सतत गोळीबार करत आहेत.हेही वाचा...VIDEO : आता चिमुकलेही मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरडोक्यावरून गेला ऑईल टँकर, तरुणाचा जागीच मृत्यूसावधान ! मुंबईतील चायनीज गाड्यांवरील चिकन रोगटलेल्या, मेलेल्या कोंबड्यांचं 

Trending Now