इस्रोकडून 'IRNSS-1I' या नेव्हिगेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

या उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat
12 एप्रिल : इस्रोनं आज पहाटे महत्वाच्या नेव्हिगेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरिकोटामधून पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी हा उपग्रह अंतराळात झेपावलं. खासगी कंपनी अल्फा डिझाईन इस्रो यांनी संयुक्तपणे हा उपग्रह विकसित केला आहे.या नेव्हिगेशन उपग्रहाचं वजन 1425 किलो आहे. तसंच या उपग्रहाची लांबी 1.58 मीटर, उंची 1.5 मीटर आणि रुंदी 1.5 मीटर असून, हा उपग्रह बनवण्यासाठी 1420 कोटी रुपयांइतका खर्च आला आहे. IRNSS-1I असं त्याचं नाव. खासगी कंपनीशी भागिदारी करून उपग्रह प्रक्षेपित करण्याची ही दुसरी वेळ आहे.या उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे. तसेच या सॅटेलाइटचा नौदलाला मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.

Trending Now