18 हजार पगार घेणारा निघाला 20 कोटीचा मालक!

इंदूर महानगरपालिकेत काम करणारा सर्वसाधारण कर्मचारी असलम खान हा तब्बल २० कोटीचा मालक निघालाय.

इंदूर, 6 ऑगस्ट : इंदूर महानगरपालिकेत काम करणारा सर्वसाधारण कर्मचारी असलम खान हा तब्बल २० कोटीचा मालक निघालाय. इंदूरमध्ये त्याचे 5 आलीशान घर असून, त्याच्या घरात 2 किलो सोनं, 15 लाख रोख, तब्बल ५ लाखाचे बोकडं आढळून आली. याशिवाय त्याची आणखी संपत्तीचाही माहिती पोलिसांना मिळाली आहे. असलम खानच्या घरात किमती होम थियेटरही लावलेले आहे.असलम खानच्या अशोका कॉलनील्या घरासह पाच ठिकाणी असलेल्या घरात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. देवास, महू भागातील त्याच्या जमिनी, दोन दुकाने, घरांचे दस्तएवज, लाखो रूपये किमतीचे दागीने आणि बँक खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे.याव्यतिरीक्त एक फ्लॅट, तीन चारचाकी वाहने ज्यांमध्ये एसी लागलेले आहेत. यांत एक सेडान कार आहे आणि एक क्लासिक जीप आहे. तीन महागड्या दुचाक्या त्याच्याकडे आढळून आल्या आहेत. असलम हा महानगरपालिकेत 18 हजार रुपये पगार एसलेला एक सर्साधारण कर्मचारी आहे. मनपात सर्वसाधारण कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या असलमकडे एवढी गडगंज मालमत्ता आली कशी असा प्रश्न आता निर्माण झालाय.

 

Trending Now