NEWS18 RISING INDIA SUMMIT : 'भारत लवकरच ' स्पोर्टिंग नेशन' बनेल'

भारत आता स्पोर्टिंग नेशन बनू शकतो. न्यूज 18च्या रायझिंग इंडिया समिटच्या आधी एका पॅनलच्या चर्चेत दिग्गजांनी हे मत व्यक्त केलं.

Sonali Deshpande
16 मार्च : मॅक्सिकोमध्ये शूटिंग वर्ल्ड कप झाला. त्यात भारत अग्रणी स्थानावर होता. दोन आठवड्यांपूर्वी महिला पहलवान नवज्योत कौरनं सीनियर कुस्ती चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला. भारत क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही रस घेतोय. आणि अव्वल स्थान पटकावतोय.त्यामुळे भारत आता स्पोर्टिंग नेशन बनू शकतो. न्यूज 18च्या रायझिंग इंडिया समिटच्या आधी एका पॅनलच्या चर्चेत दिग्गजांनी हे मत व्यक्त केलं. यावेळी अयाज मेनन, सीनियर एडिटर शारदा उग्रा, माजी क्रिकेटर अतुल वासन उपस्थित होते. खेळाशी संबंधित असलेल्या या जाणकारांनी सांगितलं भारत स्पोर्टिंग देश बनण्याच्या मार्गावर आहे.अयाज मेनन म्हणाले, ' खेलो इंडिया या प्रोजेक्टकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मुलांना विशेष करून मुलींना मैदानात आणणं हे खरोखर एक आव्हान असेल. पण ही संकल्पना चांगली आहे.'

तर अतुल वासवान म्हणाले, क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही लोकांचा रस वाढला पाहिजे.

Trending Now