#IndiaPostPaymentsBank : एका मिनिटात उघडणार खातं, अंगठाच असेल 'अकाऊंट' नंबर !

पोस्ट पेमेंट्स बँकेचे ऑनलाईन अॅपही करण्यात आलंय.

नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : मोदी सरकारने आज आणखी एका महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचं उद्घाटन करण्यात आलंय. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी पोस्ट पेमेंट बँकेत खातं उघडून योजनेला सुरुवात केली. या बँकेत एका मिनिटापेक्षा कमी वेळेत खातं काढलं जाऊ शकतं. पोस्ट बँकेत खातं काढण्यासाठी ग्राहकांचं किमान वय १८ वर्ष पूर्ण असलं पाहिजे. त्याचबरोबर एका वर्षाच्या आत खातेधारकांना केवायसी पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. पोस्ट पेमेंट्स बँकेचे ऑनलाईन अॅपही करण्यात आलंय. अॅप डाऊनलोड करून देखील तुम्ही या बँकेत खातं काढू शकता. ऑनलाइन खातं काढण्यासाठी एक मिनिटांहून कमी वेळ लागणार आहे. त्याचबरोबर कुठलीही व्यक्ती आधार कार्ड देऊन शुन्य रूपयात पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं काढू शकणार आहे. पण खातं काढल्यानंतर त्यामध्ये किमान १०० रूपये असणं बंधनकारक आहे. तसंच करंट अकाऊंटमध्ये हजार रूपये असणं अवश्यक आहे. या बँकेचे सगळे काम हे अंगठा स्कॅन करूनच होते. त्यामुळे तुम्हाला कुठलाही अकाऊंट नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही.

=========================================पॅनकार्डमध्ये झाले हे महत्त्वाचे बदल, तुम्ही पाहिलेत का ?

Trending Now