सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं, शरद पवारांचा हल्लाबोल

सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याची टीका शरद पवारांनी केलीय. औरंगाबादेत हल्लाबोल यात्रेच्या समारोपात ते बोलत होते. सरकार शेतकऱ्यांची वीज तोडतंय. पाणी देत नाही, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केलीय.

Sonali Deshpande
03 फेब्रुवारी : सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याची टीका शरद पवारांनी केलीय. औरंगाबादेत हल्लाबोल यात्रेच्या समारोपात ते बोलत होते. सरकार शेतकऱ्यांची वीज तोडतंय. पाणी देत नाही, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केलीय.औरंगाबादमधली इंटरनेट सेवा बंद करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. आता ते आवाज दाबतायेत त्याला बटन दाबून उत्तर द्या असं आवाहन अजित पवारांनी केलंय.राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा समारोप आज औरंगाबादेत झाला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप सभा झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून 16 जानेवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सुरवात झाली होती. नऊ दिवस ही यात्रा सुरू होती. या नऊ दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सात जिल्ह्यांमधल्या 26 तालुक्‍यातल्या जनतेशी संवाद साधला. आजच्या समारोपाच्या रॅलीला विधान परिषदेतील उपनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.

Trending Now