#News18RisingIndia : पदापेक्षा कुणी मोठा नसतो -राजनाथ सिंह

आमच्या सरकारने काय केलं काय नाही केलं यावर वाद होऊ शकतो, पण आमच्या पंतप्रधानांच्या कार्यावर जगातली कोणतीही ताकद प्रश्न विचारू शकत नाही

Sachin Salve
17 मार्च : नवी दिल्लीत नेटवर्क १८ची रायझिंग इंडिया समिट सुरू आहे, याच परिषदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर अतिशय मार्मिक भाष्य केलंय.मला जास्त आशा-अपेक्षा नाहीये. देशाच्या विकासात शेतकऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचं योगदान आहे. पदावर बसल्यामुळे कुणीही मोठं होत नाही, तुम्ही कितीही मोठ्या खूर्चीवर बसले तरी सरतेशेवटी ते पदच महत्वाचं असतं, पण महात्मा गांधींसारखं नेतृत्व हे नेहमीच कोणत्याही पदाशिवाय मोठं असतं, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.न्यूज 18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया समिटच्या आज दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यांनी भारतापुढील आव्हानांवर आपले विचार मांडले.आमच्या सरकारने काय केलं काय नाही केलं यावर वाद होऊ शकतो, पण आमच्या पंतप्रधानांच्या कार्यावर जगातली कोणतीही ताकद प्रश्न विचारू शकत नाही असं राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितलं.

'पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतो'त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानाला खडेबोल सुनावले. आपल्या शेजारील राष्ट्रासोबत आपले संबंध चांगले असले पाहिजे,पाकिस्तानसोबत आम्ही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण पाकिस्तान काही ऐकत नाहीये. पाकिस्तान हाफिज सईद सारख्या दहशतवाद्याला पक्ष काढण्याची परवानगी देतोय, उद्या तो निवडणूक लढवून पाकच्या संसदेत बसेल, पाकिस्तान हक्कानी नेटवर्कला पाळतो, दहशतवाद्यांना पाळतोय हे खपवून घेतलं जाणार नाही अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी पाकला सुनावलं. तसंच आपलं सैन्य देशाचं संरक्षण करतंय पण वेळ आलीतर आम्ही सीमा रेषा ओलांडून जाऊन देशाचं संरक्षण करण्यात कमी करणार नाही-असंही राजनाथ सिंह म्हणाले."काश्मिर हा भारताचाच" तसंच काश्मिर हा भारताचाच भाग आहे आणि राहणारच, जगातली कोणतीही ताकद आम्हाला यापासून रोखू शकत नाही असंही राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं."काश्मीरची मुलं ही आमची मुलं आहे"काश्मीरची मुलं ही आमची मुलं आहे. त्यांच्या आयुष्यासोबत खेळ होतोय. त्यांना जिहाद शिकवला जातोय, मी हे म्हणले की तुम्ही जिहाद करा तेव्हा आमच्या मुलांना ही शिक्षा द्या. मोठ्या जागेवर बसून जिहाद शिकवतात, नेते होतात. स्टोन पेल्टिंगमध्ये 9000 पेक्षा जास्त मुलांचा समावेश होता, जे अल्पवयीन मुलं कुणाच्या सांगण्यावरून सहभागी झाली होती त्यांना जेलमध्ये टाकण्यापासून मी रोखलं असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.गोरखपूरमध्ये पराभव झाला तो मान्य आहे पण आता यापुढे असं होणार नाही असा दावाही राजनाथ सिंहांनी केला.'बँक घोटाळा आम्ही बाहेर काढला'पारदर्शकता जितकी वाढेल तितकाच भ्रष्टाचार बाहेर येईल, आज बँक घोटाळ्याची मोठी चर्चा आहे. मी नाव घेणार नाही पण जो पळून गेलाय त्याला आम्ही मदत केली असा आरोप होतोय. पण खरं हे आहे की, आमच्या सरकारमुळे बँक घोटाळ्याची प्रकरणं बाहेर आली असा दावाही राजनाथ सिंहांनी केला.

Trending Now