काळ आला होता, वेळ नाही : भुस्खलनातून असा वाचला स्कुटरस्वार

हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे ठिक ठिकाणी भुस्खलन होत आहे. त्याच बरोबर रस्त्याचेही प्रचंड नुक्सान होत आहे.
बिलासपूरमध्ये गुरुवारी संध्याकाळी एक स्कुटरस्वार भुस्खलनातून थोडक्यात वाचला. रस्ता ओलांडण्याच्या नादात तो मृत्यूच्या दारातून परत आला आहे. यामध्ये एका सेकंदच्या फरकाने त्याचा जीव वाचला.
बिलासपूरमधील घुमारवींपासून बरठींला जाणाऱ्या रस्त्याजवळ सुहाणी गावानजीक हे भुस्खलन झाले आहे.

इतर वाहन चालकांना आधीच याची शंका आली होती त्यामुळे त्यांनी रस्ता ओलांडला नाही. पण तो स्कुटरस्वार घाईने पुढे निघाला होता. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती. तो थोडासा पुढे जाताच वरुन दरड कोसळली आणि तो भुस्खलनात सापडता सापडता वाचला. तेथील लोकांनी याचा व्हिडीओ बनवला आणि तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Trending Now