हार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली

अहमदाबाद गुन्हे शाखेद्वारे देशद्रोहाच्या जुन्या प्रकरणात पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचा जवळचा साथीदार अल्पेश कठेरियाला अटक केल्यानंतर सुरतमध्ये तणाव निर्माण झाला आहे. रविवारी अल्पेशच्या अटकेलाविरोध दर्शवत जमावाने सूरतमध्ये बीआरटीएसच्या बसला आग लावली आणि एका बसस्टँडवर तोडफोड केली. योगी चौकी परिसरात बस पेटवण्यात आली. तर वरच्छा परिसरात बस स्टँडची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी रस्त्यांवर टायरदेखील जाळण्यात आले. तसेच सौम्य दगडफेकही करण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून हिंसा करणाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याचे, सूरत पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांनी सांगितले.

Your browser doesn't support HTML5 video.

सूरत, २० ऑगस्ट- अहमदाबाद गुन्हे शाखेद्वारे देशद्रोहाच्या जुन्या प्रकरणात पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचा जवळचा साथीदार अल्पेश कठेरियाला अटक केल्यानंतर सुरतमध्ये तणाव निर्माण झाला आहे. रविवारी अल्पेशच्या अटकेलाविरोध दर्शवत जमावाने सूरतमध्ये बीआरटीएसच्या बसला आग लावली आणि एका बसस्टँडवर तोडफोड केली. योगी चौकी परिसरात बस पेटवण्यात आली. तर वरच्छा परिसरात बस स्टँडची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी रस्त्यांवर टायरदेखील जाळण्यात आले. तसेच सौम्य दगडफेकही करण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून हिंसा करणाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याचे, सूरत पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांनी सांगितले.

Trending Now