सॅनिटरी नॅपकीन्स जीएसटीमुक्त,केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

जीएसटी काॅन्सिलच्या 28व्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. आता सॅनॅटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागणार नाही. सॅनिटरी नॅपकीन जीएसटीमुक्त झालं.

News18 Lokmat
नवी दिल्ली, 21 जुलै : जीएसटी काॅन्सिलच्या 28व्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. आता सॅनॅटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागणार नाही. सॅनिटरी नॅपकीन जीएसटीमुक्त झालं. याशिवाय अनेक 28 टक्के जीएसटी असलेल्या उत्पादनांवरचा जीएसटी हटवला गेलाय. सॅनॅटरी नॅपकिन्सवरचा जीएसटी रद्द करावा ही मागणी जोर धरत होती. त्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली होती.  सॅनॅटरी नॅपकिन्सवर अगोदर 12 टक्के जीएसटी होता.

एकूणच 35 उत्पादनांवरचा जीएसटी हटवला गेलाय. याशिवाय जीएसटी रिटर्न भरायचे नियमही आता सोपे केलेत. महिन्यात 3 वेळा रिटर्न्स भरायचंही रद्द केलंय. अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. महिलांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.

Trending Now