मीही तरुणपणात अॅडल्ट फिल्म पाहत होतो -मनोहर पर्रिकर

"त्यावेळी एक लोकप्रिय अॅडल्ट फिल्म होती. मी आणि माझा भाऊ अवधूत ही फिल्म पाहण्यासाठी गेलो होतो"

Sachin Salve
 15 नोव्हेंबर : एकीकडे हार्दिक पटेलच्या व्हायरल व्हिडिओवरून चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तरुणपणात आपणही अॅडल्ट फिल्म पाहात होतो अशी जाहीर कबुली दिलीये.मंगळवारी गोव्यात बालदिवसानिमित्ताने एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मुलांनी तरुण असताना तुम्ही कोणते सिनेमे पाहात होता असा सवाल केला होता. त्यावर पर्रिकर म्हणाले,  मी तरुणपणात सिनेमेचं नाहीतर अॅडल्ट फिल्मही पाहात होतो, आजच्या काळात बऱ्याचशा गोष्टी टीव्हीवर दाखवल्या जातात, त्यावेळी अॅडल्ट फिल्म सुद्धा दाखवल्या जात होत्या असा अनुभवच पर्रिकरांनी सांगितला.

त्यावेळी एक लोकप्रिय अॅडल्ट फिल्म होती. मी आणि माझा भाऊ अवधूत ही फिल्म पाहण्यासाठी गेलो होतो. मध्यंतरानंतर जेव्हा थिएटर्समध्ये दिवे लागले तेव्हा आमचा शेजारी माझ्या बाजूला बसला होता. त्याला पाहुन आमची भंबेरी उडाली होती. आम्हाला भीती होती की आमचा शेजारी आता आमच्या घरी सगळं काही सांगतील. त्यामुळे मी आणि माझ्या भावाने तेथून पळ काढला होता. आणि घऱी गेल्यावर काय सांगायचं हे ही मनाशी पक्कं केलं होतं असा किस्साही पर्रिकरांनी सांगितला.घरी आईकडे दिला कबुलीनामाते पुढे म्हणाले, जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा आईला स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही सिनेमा पाहण्यासाठी गेलो होतो पण आम्हाला तो सिनेमा अॅडल्ट असेल हे वाटलं नव्हतं. आम्ही मध्येच हा सिनेमा सोडून बाहेर पडलो. तिथे आपले शेजारीही होते असा कबुलीनामाच घरी दिला....अन् शेजाऱ्याची झाली पंचाईतत्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या शेजाऱ्याने मोठ्या उत्साहाने आईला बोलावून आमच्या बदल सांगितलं. पण आईकडे आम्ही आधीच कबुली दिल्यामुळे आईने आमची बाजू घेतली. मला माहित आहे ते कुठे गेले होते. पण तुम्ही तिथे काय करत होता ? असा सवाल केल्यावर शेजाऱ्याने तिथून काढता पाय घेतला असंही पर्रिकरांनी सांगितलं.

Trending Now