तिसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.2%; चीनलाही टाकलं मागे

या तिमाहीत भारताच्या जीडीपीत लक्षणीय वाढ झालीय. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी 6.5 टक्के होता. त्यावरून देशावर भरपूर टीका झाली होती.

Chittatosh Khandekar
28 फेब्रुवारी:  आर्थिक वर्ष 2017-18च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.2%वर पोचला असून याच काळात भारताने जीडीपीच्या बाबतीत चीनलाही मागे टाकलंय. याच तिमाहीतला चीनचा जीडीपी  6.8% होता. या तिमाहीत भारताच्या जीडीपीत लक्षणीय वाढ झालीय. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी 6.5 टक्के होता. त्यावरून देशावर भरपूर टीका झाली होती. या तिमाहीत जीडीपीत वाढ होण्याची अपेक्षा होती. पण अर्थशास्त्रींना जीडीपी 7 टक्क्यांचा आकडा ओलांडेल ही अपेक्षा नव्हती. हे मुख्यत: उर्जित पटेल यांनी स्वीकारलेली मॉनेटरी पॉलिसीचा परिणाम असल्याची चर्चा आहे. तसंच मोदी सरकारनं उचललेली पाऊलंसुद्धा याला जबाबदार आहेत. गेल्या एका वर्षात नोटाबंदी आणि जीएसटीनंतर जीडीपी घसरला होता. यावर्षीचा जीडीपी 6.6 टक्क्यांवर स्थिर राहील असा   अंदाज होता.

पण आताच या जीडीपीने 7टक्क्यांचा आकडा ओलांडला आहे. येत्या काळात हा जीडीपी अजून वाढेल आणि अर्थव्यवस्थेत तेजी येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. तसंच जानेवारी ते मार्च दरम्यान अर्थव्यवस्थेचे सगळे सेक्टर अधिक मजबूत होतील असा ही तर्क बांधला जातोय.आता खरंच अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते की नाही हे येणारा काळच ठरवेल

Trending Now