मद्यधुंद तरुणाने विमानात महिलेच्या सीटवर केली लघुशंका

नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने महिला प्रवाशाच्या सीटवर लघुशंका केल्याची घटना घडलीये. न्यूयाॅर्कहुन दिल्लीला हे एअर इंडियाचे विमान आले होते. महिला प्रवाशाच्या मुलीने टि्वट करून घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी एअर इंडियाला चौकशीचे आदेश दिले आहेत. इंद्राणी घोषने एअर इंडियाला टि्वट करून सांगितलं की, न्यूयाॅर्क येथील जाॅन एफ केनेडी विमानतळावरून दिल्लीसाठी येत होतो. विमानात माझी आई AI102 या सीटवर बसलेली होती. तेव्हा तिथे एक मद्यधुंद तरूण आला आणि त्याने सीटवर लघुशंका केली. हा प्रकार अत्यंत किळसवाणा होता. त्या विमानाने एकट्याने प्रवास करत होत्या. त्यांच्यासाठी ही घटना अत्यंत धक्कादायक होती.

अद्याप एअर इंडियाने यावर कोणताही खुलासा केलेला नाही. इंद्राणी घोष यांनी या प्रकरणी मद्यधुंद प्रवाश्यावर कडक कारवाईची मागणी केलीये. तिने याबद्दल अनेक टि्वट केले आहे. एका टि्वटमध्ये तिने सांगितलं की, 'मी जेव्हा तक्रार करण्यासाठी काॅल सेंटरवर प्रतिनिधीकडे तक्रार केली तेव्हा त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही उलट त्याने एअर इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. अशा घटनामध्ये एअर इंडियाने कडक पावलं उचली पाहिजे जेणे करून भविष्यात असं करण्याची कुणाची हिंमत होणार नाही.'===================================================================================VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

Trending Now