एवढ्या संपत्तीचे मालक होते अटल बिहारी वाजपेयी

त्यांच्याकडे अमेरिकेत जाऊन उपचार करण्या इतपही पैसे नव्हते

News18 Lokmat
नवी दिल्ली, १७ ऑगस्ट- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक मुलाखतीत त्यांच्या संपत्तीबद्दल बोलताना म्हटले की, १९८७ मध्ये किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. तेव्हा त्यांच्याकडे अमेरिकेत जाऊन उपचार करण्या इतपही पैसे नव्हते. तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी तेव्हा वाजपेयी यांची मदत केली होती. राजीव गांधींनी केलेली मदत वाजपेयी विसरले नाहीत. त्यांनी सार्वजनिक सभांमध्ये त्यांचे याबद्दल आभारही मानले होते. एका वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, त्यांची एकूण मालमत्ता १४.०५ कोटी एवढी होती. मात्र २००४ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वाजपेयी यांची एकूण संपत्ती ५० लाख रुपयांच्या आसपास होती.काय आहे हा २००४ चं प्रतिज्ञापत्र?अटल बिहारी वाजपेयी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले होते. यादरम्यान, त्यांनी संपत्तीशी निगडीत जो हलफनामा निवडणूक आयोगाला दिला होता. या हलफनाम्यानुसार त्यांची एकूण संपत्ती ही ५८ लाखांच्या आसपास होती. वाजपेयी यांचे स्टेट बँकमध्ये दोन अकाऊंट होते. त्यातील एका अकाऊंटमध्ये २० हजार रुपये तर दुसऱ्या अकाऊंटमध्ये ३ लाख ८२ हजार ८८६ रुपये ४२ पैसे एवढी रक्कम होती. याच बँकेच्या अजून एका अकाऊंटमध्ये २५ लाख ७५ हजार ५६२ रुपये ५० पैसे एवढी रक्कम होती.

VIDEO: अटल बिहारी वाजपेयी दौऱ्यांमध्ये असे भेटायचे नरेंद्र मोदींना

त्यांच्याकडे १ लाख २० हजार ७८२ रुपयांचे २,४०० युनिट बॉण्डही होते. हे यूनिट यूटीआय-१९९१ आणि १९९३ च्या नॅशनल सेव्हिंग योजनेअंतर्गत देण्यात आले होते. तसंच वाजपेयी यांच्याकडे २२ लाख रुपये एवढी किंमत असलेलं एक घर दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलाश येथे होते. तसेच ग्वालियरमधील त्यांच्या मूळ घराची किंमत ६ लाख रुपयांपर्यंत होती. वाजपेयी यांनी डीएव्ही कॉलेज, कानपूरमधून राज्यशास्त्र या विषयात एम.ए. केले होते.वर्तमानात किती होती संपत्ती?वर्तमानात त्यांच्याकडे किती संपत्ती होती याबद्दल कोणालाही फारसे माहित नाही. पण www.celebritynetworth.com या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, वाजपेयी यांच्याकडे सर्वसामान्यपणे १४.०५ कोटी रुपये एवढी संपत्ती होती.

Trending Now