अबब ! ऑपरेशनवेळी किडणीतून निघाले चक्क 856 दगड

राजधानी दिल्लीत डॉक्टरांच्या एका टीमने ही सर्जरी केली आहे. आणि या सगळ्या प्रकारानंतर डॉक्टरही थक्क झाले आहेत.

नवी दिल्ली, 10 जुलै : दिल्लीच्या एका रुग्णालयात अजब प्रकार घडला आहे. एका 45 वर्षीय व्यक्तीच्या मूत्रपिंडाच्या ऑपरेशनवेळी त्याच्या किडणीतून चक्क 856 दगड बाहेर काढण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत डॉक्टरांच्या एका टीमने ही सर्जरी केली आहे. आणि या सगळ्या प्रकारानंतर डॉक्टरही थक्क झाले आहेत.किडणीमध्ये अडकलेले सगळे दगड बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलं. पण अनेक प्रयत्नांनंतर हे ऑपरेशन यशस्वी झालं आणि रुग्णाच्या किडणीतून 856 दगडी बाहेर काढण्यात आली.रुग्णालयाच्या यूरोलॉजी विभागाच्या संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितलं की, रुग्णाच्या किडणीमध्ये दगड असल्याचा कोणताही प्राथमिक अंदाज नव्हता. त्याला फक्त मूत्रपिंडाचा त्रास होता. त्यामुळे त्याच्या लघवीच्या जागेतून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे हे ऑपरेशन करताना मोठं आव्हान समोर होतं.

दरम्यान, याआधीसुद्धा 2007मध्ये या व्यक्तीच्या डाव्या किडणीचं ऑपरेशन झालं होतं. पण मुळात त्यांच्या पोटात इतकी दगड गेली कशी याचा आता पोलीस तपास घेत आहेत.

Trending Now