राफेल विमान खरेदीत काहीही घोटाळा झालेला नाही- निर्मला सीतारमण

तुम्ही तुलना नाही करू शकत. मोल तर तेव्हा लावायचं जेव्हा तुम्ही ती वस्तू खरेदी करता,' न्यूज18रायझिंगइंडियाच्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण बोलत होत्या.

Sonali Deshpande
नवी दिल्ली, 17 मार्च : 'विरोधी पक्ष म्हणतो की त्यांच्या काळात ते कमी दरानं शस्त्र खरेदी करायचे. आम्ही राफेल विमानं खरेदी केली. पण तुम्ही तुलना नाही करू शकत. मोल तर तेव्हा लावायचं जेव्हा तुम्ही ती वस्तू खरेदी करता,' न्यूज18रायझिंगइंडियाच्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण बोलत होत्या. त्या म्हणाल्या राफेल विमान खरेदीत काहीही घोटाळा झालेला नाही.त्या म्हणाल्या, 'आम्ही यंत्रांची आयात कमी कशी करता येईल, ते पाहतोय. आम्हाला जास्त हत्यारांची निर्मिती करायचीय आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लष्कराला तयार करायचंय. या तीनही गोष्टी वेगानं करायच्यात.'संरक्षणासाठीच्या  बजेटवर आम्ही खूश आहोत. आता लष्कराला अत्याधुनिक करायचंय, असंही संरक्षण मंत्री एन सीतारामन म्हणाल्या. युद्धावेळच्या महिलांच्या भूमिकेबद्दल त्या म्हणाल्या, महिला विविध भूमिका निभावण्यात कुणी विरोध करत नाहीय.

त्या म्हणाल्या, भारताला मॅनिफॅक्चरिंग हब बनवायचंय.

Trending Now