दाऊदला भारतात यायचंय, पण...

मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिमला भारतात परत यायचं असल्याची माहिती दाऊदचे वकील श्याम केसवानी यांनी दिली आहे. मात्र यासाठी दाऊदनं काही अटीसुद्धा ठेवल्या आहेत.

Sonali Deshpande
07 मार्च : मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिमला भारतात परत यायचं असल्याची माहिती दाऊदचे वकील श्याम केसवानी यांनी दिली आहे. मात्र यासाठी दाऊदनं काही अटीसुद्धा ठेवल्या आहेत.त्यापैकी त्याला आर्थर रोड जेलमध्येच ठेवलं जावं अशी दाऊदची मागणी आहे. ही माहिती केसवानी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.खरं तर या आधी देखील दाऊदने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्याद्वारे दाऊदने हा संदेश पाठवला होता. पण ही फक्त दाऊदची खेळी असल्याचं मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय. उलट दाऊदच्या वकिलांची दाऊदशी बातचीत कशी झाली? असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला आहे.

Trending Now