चिदंबरम यांची अटक 10 जुलैपर्यंत टळली

एअरसेल मॅक्सिसचा व्यवहार ३,५०० कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मीडिया खटल्यात ३०५ कोटी रुपयांचा संबंध आहे.

Sonali Deshpande
नवी दिल्ली, 05 जून :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना विशेष व दिल्ली उच्च न्यायालयाने एअरसेल मॅक्सीस व्यवहार व आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार खटल्यात पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला.विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी एअरसेल मॅक्सिस खटल्यात चिदंबरम यांना 10 जुलैपर्यंत अटक करू नये, असा आदेश सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिला. पतियाळा कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळालाय.एअरसेल मॅक्सिसचा व्यवहार ३,५०० कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मीडिया खटल्यात ३०५ कोटी रुपयांचा संबंध आहे. चिदंबरम हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा हिरवा कंदिल वरील दोन्ही प्रकरणात दिला गेला होता. त्याच वेळी कथित गैरव्यवहार झाल्यामुळे चिदंबरम यांची त्यातील भूमिका चौकशी यंत्रणा तपासत आहेत.काय आहे प्रकरण ?

- चिदंबरम अर्थमंत्री असतानाचं प्रकरण (2006)- एअरसेल-मॅक्सिस कंपनीला गुंतवणुकीची परवानगी- फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडून एअरसेलला परवानगी- काही दिवसांत एअरसेलनं कार्ती चिदंबरमच्या कंपनीत पैसे भरले- ASCPL कंपनीला 26 लाखांचं पेमेंट- मुलाला फायदा व्हावा म्हणून पक्षपातीपणा केल्याचा आरोप- ईडी, सीबीआयकडून चौकशी ​

Trending Now