Live Blog: मथुरेजवळ रेल्वेने 8 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू

दोन्ही देशांमध्ये परस्परांचा विश्वास संपादन करणं आणि भविष्यात डोकलमसारखी घटना घडू न देणं हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे

13:20 (IST)

मथुरा : मथुरेजवळ आज एक भीषण अपघात झाला. चुकीच्या बाजूनं ट्रेन पकडताना दुसऱ्या एका ट्रेननं उडवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. मथुरेपासून 41 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसी कलान रेल्वे स्थानकात हा अपघात झाला. आग्रा-दिल्ली इंटरसिटी एक्स्प्रेसला खूप गर्दी असते, म्हणून काही जण चुकीच्या बाजूनं ट्रेनमध्ये चढायचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी दुसऱ्या दिशेनं छत्तीसगड संपर्क क्रांती एक्स्प्रेस आली. कोसी कलानला या ट्रेनचा हॉल्ट नसल्यानं ट्रेन वेगात होती. ट्रेननं एकूण 8 जणांना उडवलं. जखमींना तातडीनं नजीकच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. दरम्यान, इतर प्रवाशांनी रेल्वे आणि पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. 

13:19 (IST)

बंगळूरू : दक्षिण कर्नाटकच्या कूर्गमध्ये केरळसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे कूर्गकडे जाणारे सर्व रस्ते एक तर ठप्प आहेत किंवा खचले आहेत. गेल्या 10 दिवसांत तिथे इतका पाऊस झाला की ठिकठिकाणी भूस्खलन आणि दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.. कोडगू जिल्ह्यात 12 जणांचा मृत्यू झाला.. तर आतापर्यंत 4 हजार 320 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. काल पूरग्रस्तभागाचा हवाईदौरा करायला गेलेले मुख्यमंत्री कुमारस्वामी हे विमानात पेपर वाचत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं नवा वाद निर्माण झालाय. तर दुसरे ज्येष्ठ मंत्री रेवण्णा हे पूरग्रस्तांना बिस्किटचे पुडे पुरग्रस्तांना फेकून मदत देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टीका होतेय.

13:15 (IST)

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपचे सीईओ क्रिस डॅनियल्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. भारतामध्ये अलीकडे फेक न्यूज वाचल्यामुळे जमावानं हत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या. या फेक न्यूज बहुतांश वेळा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवल्या जातात. व्हॉट्सअॅपनं यावर तोडगा काढावा, अशी भारत सरकारची भूमिका आहे. तक्रार निवारणासाठी व्हॉट्सअॅपनं भारतात अधिकारी नेमावेत, आणि भारतातही उप कंपनी स्थापित करावी, भारतातले कायदे कंपनीनं पाळावेत अशी सूचना प्रसाद यांनी डॅनियल्स यांना केली. तर वाट्सअॅप त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती क्रिस यांनी दिलीय.

12:56 (IST)

नवी दिल्ली : केरळमधल्या महापूरानं राज्यातलं जनजीवन कोलमडून पडलं आहे. केरळच्या पुर्नउभारणीसाठी जगभरातून मदतीचा ओघ येत असून युएईनं केरळला 700 कोटींची मदत जाहीर केलीय. मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी ही माहिती दिली. अबुधाबीचे क्राऊन प्रिंस अब्दुल बीन झायेद अल नह्यान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा करून मदतीचं श्वासनही दिलं आहे अशी माहितीही विजयन यांनी दिलीय.

12:46 (IST)

नवी दिल्ली, ता. 21ऑगस्ट : केरळमधल्या महापूरानं राज्यातलं जनजीवन कोलमडून पडलेलं असतानाच आता त्यावरून राजकारण सुरू झालंय. केरळमधली परिस्थिती बिकट असल्यानं राष्ट्रीय संकट घोषीत करावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली होती. त्याला केंद्रीय पर्यटनमंत्री के अल्फोंस यांनी उत्तर दिलंय. राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 मध्ये अशी तरतूद नाही. युपीए सरकारच्या 10 वर्षांच्या काळात एकदाही राष्ट्रीय संकट असल्याचं घोषीत करण्यात आलं नव्हतं असही ते म्हणाले. या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

10:37 (IST)

जम्मू,ता. 21ऑगस्ट : जम्मू आणि काश्मीरमध्ये आज मोठा अपघात घडलाय. किश्तवारजवळ मचेल मातेच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा बस पाडर भागात चिनाल दरीत कोसळली. त्यात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्या सर्वांचे शव मिळाले असून बसमध्ये एकूण किती भाविक होते याचा अंदाज अजूनही लागलेला नाहीये. जम्मुहून ही बस सकाळी यात्रेसाठी निघाली होती. पोलीस आणि प्रशासन मदतकार्य करत आहेत.

08:48 (IST)

नालंदा- बिगहा गावातील एका महिलेची छेडछेडा काढण्यास मिळाली नाही. तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास मिळाले नाही म्हणून त्या महिलेला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेला उपचारांसाठी पटण्याला पाठवण्यात आले आहे.

08:44 (IST)

नवी दिल्ली- दक्षिण दिल्लीच्या लक्ष्मीबाई नगरमध्ये केंद्र सरकारचे मंत्री नरेंद्र तोमरचे पीए कुंदन यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली. ३० वर्षीय कुंदच्या मृतदेहाशेजारी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. सध्या सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास घेतला जात आहे.

08:40 (IST)

बिजींग, २१ ऑगस्ट- चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंग आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेई यांच्या या दौऱ्याचे मुख्य उद्देश्य हे एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात वुहानमध्ये झालेल्या अधिकृत सम्मेलनात घेण्यात आलेल्या निर्णयांची अंबलबजावणी करणे हे आहे. वुहान बैठकीत मोदी आणि शी यांनी परस्पर संबंध सुधारण्यासाठी आणि सीमेवर आप-आपल्या सैन्यांमध्ये ताळमेळ सुधारण्याचा निर्णय घेतला होता.

डोकलममध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये युद्धाचे चिन्ह दिसत होते. दोन्ही देशांमध्ये परस्परांचा विश्वास संपादन करणं आणि भविष्यात डोकलमसारखी घटना घडू न देणं हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. या चार दिवसांच्या दौऱ्यात चीनचे संरक्षण मंत्री आणि भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यात प्रतिनिधिमंडळ स्थरावर अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहेत. यासारख्या देश- विदेशच्या महत्त्वपूर्ण बातम्या तुम्ही इथे वाचू शकता.

बिजींग, २१ ऑगस्ट- चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंग आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेई यांच्या या दौऱ्याचे मुख्य उद्देश्य हे एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात वुहानमध्ये झालेल्या अधिकृत सम्मेलनात घेण्यात आलेल्या निर्णयांची अंबलबजावणी करणे हे आहे. वुहान बैठकीत मोदी आणि शी यांनी परस्पर संबंध सुधारण्यासाठी आणि सीमेवर आप-आपल्या सैन्यांमध्ये ताळमेळ सुधारण्याचा निर्णय घेतला होता. डोकलममध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये युद्धाचे चिन्ह दिसत होते. दोन्ही देशांमध्ये परस्परांचा विश्वास संपादन करणं आणि भविष्यात डोकलमसारखी घटना घडू न देणं हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. या चार दिवसांच्या दौऱ्यात चीनचे संरक्षण मंत्री आणि भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यात प्रतिनिधिमंडळ स्थरावर अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहेत. यासारख्या देश- विदेशच्या महत्त्वपूर्ण बातम्या तुम्ही इथे वाचू शकता.

Trending Now