सुप्रीम कोर्टाने ठोठावला गुगल,फेसबुक,व्हाॅट्सअॅपला एक लाखांचा दंड

चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडिओ न हटवल्यामुळे कोर्टाने या कंपन्यांना प्रत्येकी एक-एक लाखांचा दंड ठोठावलाय.

Sachin Salve
 नवी दिल्ली, 21 मे : सुप्रीम कोर्टाने गुगल इंडिया, फेसबुक आणि व्हाॅट्सअॅपला दणका दिलाय.  चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडिओ न हटवल्यामुळे कोर्टाने या कंपन्यांना प्रत्येकी एक-एक लाखांचा दंड ठोठावलाय.सुप्रीम कोर्टाचे जस्टिस मदन बी लोकुर यांच्या खंडपीठाने गुगल इंडिया, गुगल आएलसी, मायक्रोसाॅफ्ट, फेसबुक आरलँड, फेसबुक इंडिया आणि व्हाॅटसअॅपला चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडिओ काढण्याचे आदेश दिले होते.  तसंच डेव्हलपमेंट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.पण या कंपन्यांनी कोणताही अहवाल सादर केला नाही. त्यामुळे कोर्टाने या सर्व कंपन्यांना प्रत्येकी एक-एक लाखांचा दंड ठोठावलाय. तसंच 15 जून 2018 पर्यंत शपथपत्र सादर करण्याचे नव्याने आदेश दिले आहे.

Trending Now