वाजपेयींच्या निधनानंतर पूनम महाजनांना आली वडिलांची आठवण, शेअर केला हा भावूक फोटो

पुन्हा एकदा वडिलांना गमावल्याचे दुःख होत आहे.

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट- भारतीय जनता युवा मोर्चाच्या (बीरेव्हायएम) राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली दिली आहे. शुक्रवार, १७ ऑगस्टला ट्विटरवर वडील दिवंगत प्रमोद महाजन आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना पूनम यांनी लिहिले की, ‘मला खात्री आहे तुम्ही दोघं आता एकत्र असाल...’ याआधी केलेल्या ट्विटमध्ये पूनम यांनी म्हटले की, पुन्हा एकदा वडिलांना गमावल्याचे दुःख होत आहे. वाजपेयी फक्त प्रमोद महाजनांसाठीच नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी वडिलांसमान होते. त्यांचं आमच्या हृदयातलं स्थान कायम तसंच राहील.

Trending Now