पोटनिवडणुकीत भाजप फेलच, 4 वर्षांचं हे आहे रिपोर्ट कार्ड !

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं की, "भाजपसाठी पोटनिवडणूक जिंकणे काही अवघड नाही" पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच

Sachin Salve
मुंबई, 31 मे : मागील 4 वर्षांच्या पोटनिवडणुकीचा आढावा जर आपण घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. तर भाजपची कामगिरी खराब राहिली आहे.2014 पासून झालेल्या पोटनिवडणुकीत आतापर्यंत काँग्रेस पक्षाला 5 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपने आपल्या स्वत:च्या 4 जागी पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठ्या झटका बसला होता.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या अलाहाबादमधील फुलपुर क्षेत्रात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तसंच बिहारमधील अररिया मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत पण भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपला 2014 मधील लोकसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर मात्र पोटनिवडणुकीत सलग पराभवाचाच सामना करावा लागत आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं होतं की, "भाजपसाठी पोटनिवडणूक जिंकणे काही अवघड नाही" पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच असल्याचं आत्तापर्यंतच्या पोटनिवडणुकीतील निकालावरून स्पष्ट होतं आहे. 2014 पासून 23 जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला फक्त 4 जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यांनी लोकसभेत जिंकलेल्या स्वत:च्या  6 जागा गमावलेल्या आहेत. ज्या काँग्रेसला मिळाल्या आहेत.एक नजर टाकूया आतापर्यंतच्या पोटनिवडणुकीतील आकड्यांवर :-2014 :-बीड, महाराष्ट्र2014: भाजपपोटनिवडणूक: भाजपकंधमाल, ओडिसा2014: बीजेडीपोटनिवडणूक: बीजेडीमेढ़क, तेलंगणा2014: TRSपोटनिवडणूक: TRSबडोदा, गुजरात2014: भाजपपोटनिवडणूक: भाजपमैनपुरी, उत्तर प्रदेश2014: सपापोट-निवडणूक: सपा2015 :-रतलाम, मध्य प्रदेश2015: भाजपपोटनिवडणूक: काँग्रेसवारंगल, तेलंगणा2014: टीआरएसपोटनिवडणूक: टीआरएसबनगाव, पश्चिम बंगाल2014: एआयटीसीपोटनिवडणूक: एआयटीसी2016 :-लखिमपूर, आसाम2014: भाजपपोटनिवडणूक: भाजपशहडोल, मध्य प्रदेश2014: भाजपपोटनिवडणूक: भाजपकुच बिहार, पश्चिम बंगाल2014: एआयटीसीपोटनिवडणूक: एआयटीसीतामलुक, पश्चिम बंगाल2014: एआयटीसीपोटनिवडणूक: एआयटीसीतुरा, मेघालय2014: एनपीपीपोटनिवडणूक: एनपीपी2017 :-अमृतसर, पंजाब2014: इन्कपोटनिवडणूक: काँग्रेसगुरदासपूर, पंजाब2014: भाजपपोटनिवडणूक: काँग्रेसश्रीनगर, जम्मू आणि काश्मीर2014: पीडीपीपोटनिवडणूक: नॅशनल कॉन्फरन्समल्लपुरम, केरळ2014: आययूएमएलपोटनिवडणूक: आययूएमएल2018 :-अलवर, राजस्थान2014: भाजपपोटनिवडणूक: काँग्रेसअजमेर, राजस्थान2014: भाजपपोटनिवडणूक: काँग्रेसउलुबारीया, पश्चिम बंगाल2014: एआयटीसीपोटनिवडणूक : एआयटीसीगोलखापूर, उत्तर प्रदेश2014: भाजपपोट-निवडणूक: एसपीफुलपुर, उत्तर प्रदेश2014: भाजपपोट-निवडणूक: एसपीअररिया, बिहार2014: राजदपोटनिवडणूक: आरजेडी

Trending Now