जिथे सप्तपदी घेतली, तिथेच आयुष्य संपवून टाकलं!

कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी कुणालातरी जबाबदारी द्या. मी आता सोडून जात आहे. मी निराश झालोय. असं भय्यूजी महाराजांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

Sonali Deshpande
इंदूर, 11 जून : भय्यूजी महाराज यांनी स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची सुसाईड नोट सापडली आहे. त्यातून ते अतिशय तणावात आणि निराशेत असल्याचं स्पष्ट होतं.  कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी कुणाला तरी जबाबदारी द्या. मी आता सोडून जात आहे. मी निराश झालोय. असं भय्यूजी महाराजांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. पण त्यांनी गेल्या वर्षी जिथे दुसरं लग्न केलं, तिथेच आत्महत्या केली. हा मोठा दैवदुर्विलास!इंदूरच्या सिल्वर स्प्रिंगमधल्या बंगल्यात त्यांनी आत्महत्या केली. तिथेच 30 एप्रिल 2017 रोजी त्यांनी  डाॅ. आयुषी शर्माशी लग्न केलं होतं. त्याच ठिकाणी त्यांनी लग्नाची सप्तपदी घेतली होती.गेल्या वर्षी भय्यूजी महाराज यांनी 29 एप्रिल रोजी लग्न केलं. आई आणि बहिणीच्या आग्रहाखातर महाराज पुन्हा लग्नाला तयार झाले होते. मध्य प्रदेशमधल्या डॉ. आयुषी शर्मा यांच्याशी त्यांनी इंदूर इथं विवाह केला. 200 जणांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा संपन्न झाला होता. आयुषी शिवपुरीच्या होत्या. पीएचडी केलेल्या होत्या.

Trending Now