दहावीत टॉप केलं म्हणून योगी आदित्यनाथ यांनी दिलेला चेक झाला बाऊंस आणि...!

उत्तर प्रदेश बोर्डच्या दहावीच्या एका टॉपर विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बक्षिस म्हणून दिलेला पैशांचा चेक बाऊंस झाला आहे. बरं इतकच नाही तर ...

Renuka Dhaybar
उत्तर प्रदेश, 09 जून : उत्तर प्रदेश बोर्डच्या दहावीच्या एका टॉपर विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बक्षिस म्हणून दिलेला पैशांचा चेक बाऊंस झाला आहे. बरं इतकच नाही तर चेक बाऊंस झाला म्हणून बँकेने विद्यार्थ्याकडून दंडही वसूल केला. हा सगळा प्रकार बाराबांकी जिल्ह्यात घडला आहे.बारांबाकी जिल्ह्यात यंग स्ट्रीम इंटर कॉलेजात शिकणाऱ्या आलोक मिश्राला दहावीमध्ये 93.5 टक्के पडले आहेत. या गुणांनी त्याने जिल्ह्यात टॉप केलाय तर संपूर्ण राज्यात त्याचा 7वा क्रमांक आला आहे. त्याच्या या यशामुळे त्याचं सगळ्यांकडून कौतूक केलं जातंय.आलोकने जिल्ह्यात टॉप केल्यामुळे 29 मे रोजी त्याला लखनऊला बोलावण्यात आलं होतं. आणि तिथे एका कार्यक्रमात त्याला योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 1 लाखा रुपयांचा चेक देण्यात आला. या चेकवर बारांबाकीचे शाळा निरीक्षक राजकुमार रावल यांची स्वाक्षरी करण्यात आली होती. 5 जून 2018ला आलोकने हा चेक बँकेत जमा केला. पण हा चेक बाऊंस झाल्याचं त्याला समजलं.

Trending Now