...म्हणून बकरी ईदला दिली जाते बकऱ्याची कुर्बानी

या दिवशी आपल्या सर्वात आवडत्या वस्तूची किंवा जनावराची कुर्बानी दिली जाते.

ठाणे, २२ ऑगस्ट- आज म्हणजे २२ ऑगस्टला संपुर्ण भारतात बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. या बकरी ईदला ‘ईद उल अजहा’ किंवा ‘ईद उल जुहा’ असंही म्हणतात. या निमित्ताने बकरी ईदच्या पुर्व संध्येला म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता ठाण्यातील कोलशेत घोडबंदर रोडवरील मस्जिदमध्ये दाऊदी बोहरा समाजाने मोठ्या संख्येने नमाज अदा केली. मुस्लिम समाजात बकरी ईद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुस्लिम कॅलेंडरनुसार धू असं हिज्जाच्या १० व्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. ही तारीख रमजानचा महिना संपल्यावर जवळपास ७० दिवसांनी येते. रमजानच्या एक दिवस नंतर ईद उल फिकर म्हणजे मिठी ईद साजरी केली जाते. ईद उल फिकर आणि ईद उल अजहा यांच्या जवळपास अडीच महिन्यांचा फरक असतो.इस्लामिक मान्यतेनुसार हजरत इब्राहीम खुदाच्या आदेशाने खुदाच्या मार्गावर आपला मुलगा हजरत इस्माइलची कुर्बानी द्यायला जात असताना अल्लाहने हजरत इब्राहीमच्या प्रामाणिक पणावर प्रसन्न होऊन त्याच्या मुलाचे प्राण माफ केले. मुलाच्या कुर्बानीऐवजी तेथे असलेल्या एका बकऱ्याची कुर्बानी दिली गेली. याच आधारे ईद उल अजहा किंवा ईद उल जुहा साजरा केला जातो. बकरी ईद म्हणजे कुर्बानीचा सण असं मानलं जातं. या दिवशी आपल्या सर्वात आवडत्या वस्तूची किंवा  जनावराची कुर्बानी दिली जाते.

Trending Now