अटल बिहारी वाजपेयींचे असे फोटो ज्यांनी बदलला भारताचा इतिहास !

16 ऑगस्ट : 25 डिसेंबर 1924 रोजी जन्मलेल्या अटल बिहारी वाजपेयी 1942 च्या भारत छोडो आंदोलनाच्या माध्यमातून भारतीय राजकारणात उतरले. 1951मध्ये वाजपेयी यांनी आरएसएसच्या मदतीने भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्यात श्यामा प्रसाद मुखर्जींसारख्या नेत्यांचा समावेश होता. अटल बिहारी वाजपेयी लोकसभेसाठी नऊ वेळा निवडून आले. 1962 ते 1967 आणि 1986 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. अटलबिहारी वाजपेयी 16 मे 1996 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. परंतु लोकसभेत बहुमत सिद्ध करण्यात सक्षम न राहिल्यामुळे त्यांना 31 मे 1996 रोजी राजीनामा द्यावा लागला. 1996 मध्ये वाजपेयी प्रथम 13 दिवस पंतप्रधान होते. बहुमत सिद्ध होऊ न शकल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 1998मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. सहयोगींकडून पाठिंबा काढण्याच्या कारणास्तव ते 13 महिनेच कार्यरत राहिले.

1999 साली वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. काँग्रेसशिवाय पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे ते पहिले पंतप्रधान होते. 2004च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा कडाडून पराभव झाल्यानंतर ते अनेक महिने ते राजकीय पट्ट्यावरून गायब होते. वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या घरी राहावे लागले. 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या निवासस्थानी भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वाजपेयी यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना देशाचे सर्वोच्च नागरी म्हणून 'भारत रत्न' देऊन सन्मानित केलं.

Trending Now