अटलजींची अंत्ययात्रा; सुरक्षेची तमा न बाळगता मोदी- शहा पायी चालत सहभागी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले असून आपल्या आवडत्या नेत्याला शेवटचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहेत. पण या सगळ्यात आपल्या सुरक्षेची तमा न बाळगता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे भाजप कार्यालयापासून राजघाटपर्यंत पायी चालत आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देत आहेत. त्यांच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही चालताना दिसत आहेत.सकाळी १० वाजल्यापासून त्यांचे पार्थिव भाजप कार्यलयात ठेवण्यात आले होते. आता तिथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाले आहेत. आज दुपारी ४ वाजता वाजपेयींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राजधानी दिल्लीतील राजघाटावरील स्मृतीस्थळावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दिल्लीतल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. अटलजींच्या निधनाने देशभर दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या ९ आठवड्यांपासून त्यांच्यावर 'एम्स'मध्ये उपचार सुरू होते. चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वाढतं वय आणि दीर्घ आजारामुळे उपचारांनाही प्रतिसाद देणं त्यांनी बंद केलं होतं. शेवटपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र अटलजींची आजाराशी असलेली झुंज अखेर संपली.

VIDEO: अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घ्यायल्या गेलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण

वाजपेयी गेल्या काही वर्षांपासून डिमेंशियाने या आजराने त्रस्त होते. प्रकृती अस्वस्थतेमुळं वाजपेयी यांनी सार्वजनिक जिवनातून निवृत्तीही घेतली होती. भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयींनी तीन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते बिगर काँग्रेस पक्षाचे पहिलेच नेते होते.

Trending Now