अटल बिहारी वाजपेयींवर आज होणार अंत्यसंस्कार, दिल्लीतील हे रस्ते केले बंद

प्रकृती अस्वस्थतेमुळं वाजपेयी यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली होती

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान (एम्स) येथे अखेरचा श्वास घेतला. ते ९३ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात होते. आज संध्याकाळी ४ वाजता दिल्ली येथील राष्ट्रीय स्मृती स्थळ (विजय घाट, राज घाट) येथे अंतिम संस्कार केले जातील. दुपारी १ वाजता भाजप मुख्यालयाकडून त्यांच्या अंतिम यात्रेला सुरूवात होईल. ही अंतिम यात्रा पंडित दीनदयाल उपाध्याय मार्ग, बहादुर शाह जफर मार्ग, दिल्ली गेट, नेताजी सुभाष मार्ग, निषाद राज मार्ग आणि शांति वन चौकातून राज घाटकडे जाईल.वाजपेयी यांच्या अंतिम यात्रेत हजारो लोक सहभागी होण्याची शक्यता आहेय. दरम्यान, ट्रॅफीकवर याचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी सामान्य जनतेसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकानुसार, कृष्‍णा मेमन मार्ग, सुनहरी बाग रोड, तुगलक रोड, अकबर रोड, तीस जनवरी मार्ग, क्‍लेरिज होटकडून विंडसर प्‍लाजाच्या मध्ये जनपथ, मानसिंह रोड, शाहजहां रोडपासून  तिलक मार्ग सी- हैक्‍सागन, आईपी मार्ग, डीडीयू मार्ग सकाळी आठ वाजल्यापासून बंद राहणार आहेत.

VIDEO: वाजपेयींच्या तब्येतीबद्दल ऐकून ढसाढसा रडली नात

एम्सच्या डॉक्टरांनुसार, वाजपेयी निमोनियामुळे आजारी होते. त्यांच्या अनेक मुख्य अवयवांनी काम करणं बंद केलं. त्यांना शेवटच्या दिवशी ईसीएमओ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. वाजपेयी मधुमेहना ग्रासले होते. तसेच त्यांची एक किडणी निकामी झाली होती. प्रकृती अस्वस्थतेमुळं वाजपेयी यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्तीही घेतली होती. भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयींनी तीन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते बिगर काँग्रेस पक्षाचे पहिलेच नेते होते.

Trending Now