अटलजींच्या या 10 निर्णयांनी बदललं भारताचं भविष्य

1) जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर 1977 मध्ये अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात हिंदीतून भाषण केलं. असं भाषण करणारे ते पहिलेच भारतीय नेते होते. त्यांच्या या कृतीचं सर्वच राजकीय पक्षांनी कौतुक केलं.2) पोखरणमध्ये अणुचाचणी करणं हा अटलजींनी घेतलेला सर्वात मोठा कणखर निर्णय. सत्तेवर येऊन काही दिवस झालेले असतानाच सर्व जगाचा दबाव झुगारून वाजपेयींनी 11 आणि 13 मे 1998 रोजी पोखरणमध्ये पाच अणुचाचण्या केल्या. भारत अणुशक्ती संपन्न राष्ट्र झालं. अनेक बड्या देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादले मात्र वाजपेयी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.3) 19 फेब्रुवारी 1999 ला पंतप्रधान वाजपेयी बसने पंजाब सीमेवरून लाहोरला गेले. 'सदा-ए-सरहद' असं त्या बसचं नामकरणं करण्यात आलं. वाजपेयी बसने लाहोरला गेले आणि नवाज शरीफ यांची भेट घेतली. भारत-पाकिस्तानच्या संबंधातला हा नवा अध्याय होता.

5) सुवर्ण चतुर्भुज योजना ही वाजपेयींची महत्वाकांक्षी योजना. या योजनेनुसार देशाचे चारही कोपरे हायवेने जोडण्यात आले. दिल्ली,कोलकता,चेन्नई आणि मुंबई या मोठ्या शहरांना हायवेने जोडण्यात आलं.6) ग्रामीण रोजगाराला प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांनी खास योजना सुरू केली. ग्रामीण विकासासाठी केंद्राकडून मोठा निधी दिला.7) वाजपेयी पंतप्रधान असतानाच पहिल्यांदा पूर्वोत्तरातल्या राज्यांसाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली होती.8) देशभर सर्व शिक्षा अभियानाची सुरवात करून प्राथमिक शाळेत मुलांचं शिक्षण सुटू नये यासाठी केंद्राने खास मोहिम राबवली9) भारतातली सर्व खेडी डिजिटल कनेक्टिव्हीने जोडली जावीत यासाठी त्यांनी खास योजना राबवली.10) वाजपेयींच्याच काळात भारताचे अमेरिका आणि इस्त्रायलशी संबंध सुधारले. त्यांच्या परराष्ट्र धोरणाने जगभर भारताचा प्रभाव निर्माण केला. वाजपेयींच्या तब्येतीबद्दल ऐकून ढसाढसा रडली नात

Trending Now