किडनी ट्रान्सप्लान्टनंतर प्रथमच राज्यसभेत पोहोचले अरूण जेटली

अरूण जेटली हे 65 वर्षांचे असून, 14 मे रोजी त्यांची किडनी ट्रान्सप्लान्ट करण्यात आली होती. त्याच दिवसापासून वित्त मंत्रालयाचा कारभार रेल्वे आणि कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोपविला होता.

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट - किडनी ट्रान्सप्लान्ट केल्यानंतर केंद्रीय मंत्री अरूण जेटली गुरूवारी प्रथमच राज्यसभेत पोहोचले. याच कारणास्तव जेटली यांनी वित्तमंत्री पदाचा त्याग केला होता. तीन महिन्यांचा अवकाष घेतल्यानंतर त्यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीत सहभाग नोंदविला. अरूण जेटली हे 65 वर्षांचे असून, 14 मे रोजी त्यांची किडनी ट्रान्सप्लान्ट करण्यात आली होती. त्याच दिवसापासून वित्त मंत्रालयाचा कारभार रेल्वे आणि कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोपविला होता. राज्यसभेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी प्रथमच सहभाग घेतला. 2000 या वर्षापासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मार्च महिन्यातच उत्तर प्रदेशातून त्यांची राज्यसभेकरीता निवड झाला होती.सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, जेटली यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा होत असून लवकरच ते वित्त मंत्रालयाचे कामकाज सांभाळणार आहेत. मात्र, तुर्तास त्यांच्या अनुपस्थितीत वित्त मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार रेल्वे आणि कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जेटली हे सोशल मीडियावर जास्त लोकप्रिय आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी घरुनच देशाच्या आर्थिक परिस्थितीवर ब्लॉग लिहिले आहेत. अासाममधला राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) चा मुद्दा, संसदेतील अविश्वास प्रस्ताव, राफेल लढाऊ विमान आणि जीएसटी अशा अनेक मुद्यांवर त्यांनी सोशल मीडियावर आपले विचार मांडले आहेत. अलिकडेच त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून काही कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवीला होता. बँकांच्या काही गुप्त बैठका, जीएसटीचं पहिलं वर्षानिमित्त आयोजित काही कार्यक्रमांमध्येही ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. 

Trending Now