अखेर चंदू चव्हाण भारतात परतले

Sachin Salve

21 जानेवारी : चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची 'घरवापसी' झाली. पाकिस्तानने चंदू चव्हाण यांना भारतीय सैन्याकडे सुपूर्द केलं. दोन्ही देशातील तणावपूर्ण परिस्थिती सुधारण्यासाठी हे पाऊल उचललं असं पाकिस्तानी सैन्याने सांगितलं.

भारत आणि पाकिस्तान सीमेवर नेहमी तणावपूर्ण परिस्थिती असते. चुकून सीमारेषा ओलांडून गेलेल्या भारतीय जवान असो अथवा मच्छिमारांची आतापर्यंत सुटका झाली अशी घटना फार कमी प्रमाणात घडलीये. 29 सप्टेंबर 2016 ला धुळ्याचे राहणारे चंदू चव्हाण चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये पोहोचले. पाक सैन्यांना त्यांना ताब्यात घेतलं. चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात आहेत, असा दुजोरा पाकिस्तानच्या डीजीएमओंनी दिली होता.

चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी भारताचे लष्करी अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयाचे केले होते. राज्य संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांनी चंदू चव्हाणच्या सुटकेसंदर्भात पाकिस्तानच्या लष्करी कारवायांच्या महासंचालकांशी (डीजीएमओ) जवळपास 20 ते 22 वेळा चर्चा केली होती. सुरुवातीला काहीच सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते, पण शेवटच्या वेळेस चंदूला सोडण्यासाठी पाकिस्तान अनुकुल असल्याचंही भामरे यांनी ठामपणे सांगितलं होतं.

22 वर्षीय चंदू चव्हाण जम्मू-काश्मिरमधील मंढेर जिल्ह्यात सीमारेषेवर तैनात होते. पेट्रोलिंग करत असताना चुकून चंदू चव्हाण सीमारेषा ओलांडून पाकमध्ये गेले. डीजीएमओचे लेफ्टिनेंट जनरल रणबीर सिंह यांनी सुद्धा चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. चंदू चव्हाण आणि सर्जिकल स्ट्राईकचा कोणताही संबंध नाही तो चुकून सीमारेषा ओलांडून पाकमध्ये गेला असं सिंह यांनी स्पष्ट केलं होतं. अखेर आज या प्रयत्नाना यश आलं असून चंदू चव्हाण यांची सुखरुप सुटका झाली. चंदू चव्हाण यांना आज पाकिस्तानने सुटका केली. दुपारी 3.30 ला वाघाबॅार्डरवर भारतीय सैन्याकडे सुपूर्द करण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now