तुम्हाला श्रीमंत करू शकते अंगणातील तुळस

Sachin Salve
अंगणात तुळशी वृंदावन असणे म्हणजे भारतीय संस्कृतीचे लक्षण. याच तुळशीची शेती जर व्यावसायिक पद्धतीने केली तर त्यातुन तुम्ही लक्षाधीश बनू शकता. तुळशीची मागणी औषध कंपन्यांमध्ये दुपटीने वाढली आहे. याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.उज्जैनच्या एका शेतकऱ्याने 3 महिन्यात 15 हजार रुपयांच्या तुळशीच्या लावणीवर 3 लाख रुपये कमविले. भारतात उत्तर प्रदेश,जम्मु-काश्मीर,उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांत तुळस आणि इतर काही औषधी रोपट्यांची लागवड व्यावसायिक पद्धतीने केली जाते.[wzslider]तुळशीसाठी लागवडीयोग्य कालावधी जुलैचा पहिला आठवडा असतो. ही रोपं 45 X 45 सेंटीमीटरच्या अंतरावर लावावीत. RRLOC 12 आणि RRLOC 14 या प्रकारच्या रोपांना मात्र 50 X 50 सेंटीमीटरच्या लांबीवर लावली जातात. यानंतर हलके जलसिंचन करावे.

लावणीनंतर लगेच सिंचनाची गरज असते.दर आठवड्याला किंवा जेव्हा गरज वाटेल तेव्हासुद्धा पिकांना पाणी द्यावे.उन्हाळ्यात दर 12-15 दिवसांत पिकांना पाणी द्यायचे असते.जेव्हा पहिली कापणी होते तेव्हा लगेच पाणी द्यावे. एक लक्षात घ्यावे की कापणीच्या 10 दिवस आधी सिंचन थांबवावे.ही कापणी वेळेवर व्हायला हवी कारण याचा परिणाम तेलाच्या प्रमाणावर होतो. जेव्हा पानांचा रंग हिरवा व्हायला सुरुवात होते,तेव्हा ही कापणी करावी. या रोपट्यांवर फुले आल्याने युनीनॉल आणि तेलाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळेच फुले येऊ लागली की रोपट्यांची कापणी सुरु करावी.जमिनीपासुन 15 ते 20 मीटर उंचीवर रोप कापावे. याचा फायदा असा की तिकडेच नवीन रोपांची वाढ होऊ लागेल. कापणी करताना जर डहाळीवर पाने राहत असतील तर राहु द्यावी,त्याने फायदाच होईल.जर 10 फुट जागा असेल तर जवळपास 3 हजार रुपयांच्या 10 किलो बियाणांची गरज असेल. 10 हजार रुपयांचे खत आणि 2 हजार रुपये इतर खर्च होईल.एका सिझनला जवळपास 8 क्विंटल पिक येते.याची नगदी किंमत 3 लाखांपर्यंत जाते.हे पीक विकण्यासाठी आपण जवळच्या मंडईतील एजंट्सशी संपर्क साधु शकतो किंवा ऑनलाईन सर्च करू शकतो. तुळशीची मागणी करणा•या औषध कंपनी किंवा एजन्सीज्‌ची माहिती गुगलवर मिळते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now