चंदू चव्हाण परत येणार ?

Sachin Salve
13 ऑक्टोबर : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे लष्कराच्या कामगिरीचं कौतुक होत होतं. पण याच काळात चंदू चव्हाण हे जवान चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात आहेत, अशी माहिती पाकिस्तानच्या डीजीएमओंनी दिलीय. त्यामुळे चंदू चव्हाण भारतात परततील, अशी आशा सगळ्यांना वाटतेय.चंदू चव्हाण हे मूळचे धुळ्याचे रहिवासी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल चिंतेचं वातावरण आहे. चंदू चव्हाण चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचं कळल्यामुळे त्यांच्या आजीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू ओढवला होता. चंदू चव्हाण परत येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या आजीच्या अस्थींचं विसर्जन करायचं नाही, असं त्यांच्या कुटंुबीयांनी ठरवलंय. चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी भारताचे लष्करी अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now