2011 मध्येही झाला होता सर्जिकल स्ट्राईक, पाक सैनिकांचे शिर आणले होते कापून !

Sachin Salve
 09 ऑक्टोबर : भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा अजूनही सुरूच आहे. 2011मध्येही असाच सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता, असं वृत्त 'द हिंदू' या वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलंय.कुपवारामध्ये गुगलधर या ठिकाणी 30 जुलै 2011 रोजी दुपारच्या वेळी पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला. त्यामध्ये 3 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यापैकी हवलदार जयपाल सिंग अधिकारी आणि लान्स नाईक देवेंदर सिंग यांचे शिर कापून पाकिस्तानी सैनिक त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. या घटनेनंतर भारतीय सैन्यातर्फे बदल्याची कारवाई करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now