इस्त्रो का करते श्रीहरीकोटातूनच प्रक्षेपण ?

Sachin Salve
इस्त्रोच्या प्रत्येक उपग्रहाचे प्रक्षेपण ज्या ठिकाणाहुन होते ते म्हणजे श्रीहरीकोटा. श्रीहरीकोटा येथे असलेल्या सतीश धवन स्पेस सेंटरविषयी आपण जाणून घेणार आहोत. हे एक स्पिंडल शेप आयर्लंड आहे जे आंध्र प्रदेशमध्ये आहे. इक्वेटरपासून जवळ असल्यामुळे ते पुर्वेकडे लॉँचिंग करण्यासाठी फायदेशीर ठरते आणि हेच याची निवड करण्याचे एक प्रमुख कारण आहे.[wzslider]या श्रीहरीकोटा बेटाला 1969मध्येच सॅटलाईट लॉँचिंग स्टेशन म्हणून निश्चित केलं होतं. 1971मध्ये RH-125 साऊंडिंग रॉकेटच्या लाँचिंगसोबत सेंटर ऑपरेशन झाला. पहिला ऑर्बिट सॅटेलाईट रोहीणी 1A हा 10 ऑगस्ट 1979 ला लॉँच केला गेला. पण एका उणिवेमुळे 19 ऑगस्टला तो नष्ट करावा लागला. याची निवड करण्याचे पहिले कारण म्हणजे श्रीहरीकोटाचे लोकेशन.

इक्वेटरपासून याची जवळीकता याला जियोस्टेशनरी सॅटेलाईटच्या लाँचसाठी उत्तम साईट बनवते. इथे आवश्यक असणारी उपकरणे खूप वजनी आणि महागडी असतात. अशी ही उपकरणे जगाच्या वेगवेगळ्या कोप•यातून आणली जातात आणि यासाठी इथंपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता,हवाईमार्गे आणि जलमार्गाने उपकरणे आणणे सोईस्कर ठरते.हे ठिकाण NH-5 ह्या नॅशनल हायवेपासून अगदी जवळ आहे. सोबतच रेल्वे स्टेशनपासून 20 किमी तर चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्टपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. अशी कामे लोकवस्तीपासून दूर राहुन करावी लागतात. लोकांचे संरक्षण आणि सार्वजनिक संपत्तीचे जतन करण्यासाठी सर्वाधिक लाँचिंग पॅड वॉटर बॉडीजवळ आहेत. फक्त बैकोनुर त्याला अपवाद आहे.भारतात दोन लाँचिंग पॅड आहेत. एक म्हणजे श्रीहरीकोटा आणि दुसरा म्हणजे थुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लाँचिंग स्टेशन. येथील लोकसंख्या खूप कमी आहे आणि ते लोक एकतर इस्त्रोशी निगडीत आहेत किंवा मग स्थानिक मच्छीमार आहेत. दर बुधवारी लिमिटेड एक्सेससह इस्त्रो व्हिझिटर्सना लाँचिंग पॅड पाहण्याची परवानगी देते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Trending Now