NASAच्या 'क्यूरॉसिटी रोवर' ने मंगळावर काढले अफलातून सेल्फी!

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या 'क्यूरॉसिटी रोवर'ने मंगळ ग्रहाचे काही दुर्मिळ फोटो काढले आहेत. या फोटोत, लाल रंगाचा हा ग्रह हलक्या लाल आणि तपकिरी रंगात दिसत आहे. तर गेल्या काही आठवड्यांपासून धुळीचा वादळामुळे त्याचा रंग गडद झाला आहे. 'क्यूरॉसिटी रोवर'ने मंगळाचे हे फोटो वीरा रुबिन रिज येथून प्रसिद्ध केले आहेत. रोवरने स्वत: मास्ट कॅमेरामधून हे फोटो घेतले आहेत, ज्यामध्ये धूळचा जाड थर दिसतो आहे. नासाच्या रेड प्लॅनेटच्या गेल क्रेटरचा अभ्यास करण्यासाठी नोव्हेंबर 2011मध्ये क्यूरॉसिटी रोवर लाँच केलं. गेल्या काही महिन्यांत वादळामुळे रोवरच्या कामावरही परिणाम झाला आहे.

यापूर्वी, मातीच्या थरांना ड्रिल करण्याचे दोन प्रयत्न मोठ्या दगडांमुळे अयशस्वी ठरले. त्यानंतर रोवरने यावर्षी नवीन ड्रिलचा वापर केला. सप्टेंबरपर्यंत, रोवर खडकाचे आणखी दोन नमुने शोधणार आहे.

Trending Now